व्हॉटसअॅप सिक्युरिटी

व्हॉटसअॅप सिक्युरिटी

गुड मॉर्निंगनं सुरू होणारा आपला मोबाइल रात्री झोपताना गुड नाइट होईपर्यंत संपत नाही. मोबाइल, इंटरनेट, सोशल नेटवर्किंगवरची अकाउंट हे सगळं वापरण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असली, तरी सध्या सर्वांना सतावणारी एक समान समस्या म्हणजे वैयक्तिक माहितीची सुरक्षितता.फेसबुक, ईमेल अकाउंट हॅक होणं आपल्याला माहीत होतं. काहींनी अनुभवही घेतला होता; पण आता व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक होण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे आपल्या फोनमधील वैयक्तिक माहिती इतरांच्या हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हॉट्सअॅप म्हणजे थेट मोबाइलशी संबंध आल्यामुळे त्याविषयीची काळजी वाटणं साहजिक आहे. व्हॉट्सअॅप म्हणजे थेट मोबाइलवर हा हल्ला आहे. ही काळजी करण्याची गोष्ट असली, तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. काही छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास आपलं व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षित राहू शकत... त्यासाठी काय करायचं तर....... व्हॉटसअॅप सेटिंगमध्ये सिक्युरिटी ऑप्शन त्यात टू स्टेप्स व्हेरिफिकेशनमध्ये जाऊन सिक्स डिजिट पिन नंबर ठेवणं व दुसरी स्टेप आहे तुमचं अकाउंट तुमच्या ईमेल अकाउंटशी जोडणं हा सहा आकडी पासवर्ड इतर कोणालाही सांगणं....व्हॉटसअॅप हॅक करण्याचा प्रयत्न झाल्यास हा सहा आकडी पिन विचारला जाईल. म्हणूनच तो सेट करून ठेवणं गरजेचं आहे.... अशा प्रकारे तुम्ही तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट सुरक्षित ठेवू शकता तसेच कोणताही फोटो, लिंक, वेगळ्या क्रमांकांवरून येणारे मेसेज, त्यातल्या काहीतरी डाउनलोड करण्याच्या रिक्वेस्ट या सगळ्या गोष्टी फॉरवर्ड करताडिलिटकरण्याची खबरदारी घ्यायची आहे. अननोन नंबरहून आलेली कोणतीही लिंक ओपन करू नका.मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांकडून तुमच्या अकाउंटसंबंधी किंवा इतर कुठल्या लिंकची विचारणा करणारा मेसेज आल्यास थेट त्यांच्याशी बोलून खात्री करा.

tech tips, whats app security

Post a Comment

[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.