शिक्षकांना सन्मान केव्हा मिळेल?

शिक्षकांना सन्मान केव्हा मिळेल?

सचिन उषा विलास जोशी यांचा शिक्षक दिना निमित्त सकाळ वृत्तपत्रातील लेख.

आज शिक्षक दिन आहे. पाच सप्टेंबरच्या दिवशी शिक्षक किती महान असतात या बद्दल शाळेपासून ते सोशल मिडीयापर्यंत सर्वांकडे चर्चा आता होईल. आपला भारतीय संस्कृती मध्ये गुरुचे  शिक्षकाचे खूप महत्व पण आहे. प्रश्‍न हा आहे रोजच्या जीवनामध्ये आपण शिक्षकांना तेवढे महत्व देतो का? शिक्षकांना तेवढा सन्मान मिळतो का?

आपण रोजच्या जीवनात शिक्षकांना आदराने वागवतो का? जर हा प्रश्‍न आपण स्वत:ला विचारला तर प्रामाणिक  उत्तर येईल ते म्हणजे ‘नाही’. आपण शिक्षकीपेक्षाकडे तीतके सन्मानाने पाहत नाही. जो डॉक्टर, इंजिनिअर, सि.ए., वैज्ञानिक घडवतो त्या शिक्षकाला संपुर्ण आयुष्यात शिक्षक दिनी फक्त दोन थँक्युचे शब्द मिळतात.
हे वाचल्यानंतर आपण मनात विचार करत असाल की आता शिक्षक त्या दर्जाचे राहिले नाही वगैरे वगैरे. मला असे वाटते प्रश्‍न दर्जाचा नसून सन्मानाचा आहे.

हल्ली विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी ना प्रेम दिसते ना पालकांच्या मनात. संस्थाचालकांना वाटते शिक्षक म्हणजे आपले नोकरच आहेत. हवे ते काम सांगा. राजकारणांना वाटते शिक्षक म्हणजे मोठी वोट बँक, आपले सर्व राजकारणातील कामे सांगायची हक्काचे व्यासपीठ. सरकारला वाटते कुठल्याही योजना आमलात आणायच्या असेल तर ‘बीन पगारी फुल अधिकारी’ म्हणजे शिक्षक. आजकाल आपण शिक्षकांना एवढे कामात अडवले आहे की तो/ती शिकवायचेच विसरुन गेला आहे. याचे कारण एवढेच की, आपला देश शिक्षकांना सन्मानाने वागवतच नाही.
ज्या देशात शिक्षकांचा सन्मान होत नाही त्या देशाचे भवितव्य धोक्याच्या उंबरठ्यावर असते. आपल्याकडे जेव्हा शिक्षक राष्ट्रपती होतो. तेव्हा त्याचा सन्मान होतो. मला वाटले जेव्हा एक राष्ट्रपती प्राथमिक शिक्षक होईल तेव्हा खरा शिक्षकाचा सन्मान समजावा.

आजकाल खाजगी शाळेमध्ये पालकांचा अ‍ॅटिड्युड असा असतो की, मी फी भरतो म्हणजे शाळेवर उपकार करतो आणि शिक्षकांना तर विकतच घेतले आहे. एखादी नजर चुकीने शिक्षकांकडून चूक झाली तर पालक मुलांदेखील शिक्षकांना झापतात. अशा वागण्याने मुलांच्या मनावर शिक्षकांबद्दल आदर राहिल?

खाजगी अनुदानित शाळेत शिक्षकांना संस्थाचालकांच्या मर्जीने हाजी-हाजी करत वागावे लागते. तसे वागले  नाहीतर सर्वांसोबत बिचार्‍याची लायकी काढली जाते. सरकारी शाळेतील शिक्षकांना तर नेहमीच टिकेचे धनी व्हावे लागते. जगात काही चुकीचे घडले तर त्याला तोच जबाबदार असतो.

कुठेही शिक्षकांना आदराने, सन्मानाने वागविले जात नाही. राजकारण्यांपासून ते विचारवंतापर्यंत, विचारवंतापासून ते साहित्यकांपर्यंत सर्वच जण शिक्षकांना अक्कल शिकवत असतात. पण तो एक माणुस आहे, त्याच्यावरपण चांगले वाईट संस्कार झाले आहेत, कोणीही त्याची मानसिक स्थिती समजवून घेण्याच्या परिस्थीती मध्ये नसतो.
कारण आपण सर्वजण शिक्षकांना सन्मान देण्याऐवजी “शिक्षण सम्राटांना” सन्मान द्यायला लागलो आहे.

संगणकामध्ये हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअरला जास्त महत्त्व आहे. पण आपण सन्मान हार्डवेअरला देतो. त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस खुसला तर तो क्लिन करण्याकडे आपल्याला रस नसतो आणि मग आपण शिक्षकांच्या नावाने खडे फोडतो पण त्यांची मानसिकता विधायक कशी बनेल यावर खोलात जावून कधी विचार करत नाही.

शिक्षकांना सन्मानाने वागणूक नाही मिळाली तर काय होते ते आपण पाहू. जेव्हा आपण सर्वजण संस्थाचालक,पालक, एकूण समाज यांनी जर शिक्षकांना सन्मानाने वागविले नाही तर विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर राहणार नाही. जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर, प्रेम निर्माण होत नाही किंवा कमी होतो तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनाचे दारे शिक्षकांबद्दल बंद होतात आणि मग  ते शिक्षक कितीही जीव ओतून शिकवत असले तरी त्यांच्या डोक्यात काही शिरत नाही. कारण कळत नकळत त्यांच्या मनाची दारे बंद असतात.
तेच जर विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर प्रेम असेल तर त्याने जसे शिकवले ते त्याच्या मनात शिरते कारण  मनाची दारे उघडी असतात. शिकणे-शिकवणे ही मानसिक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया तेव्हाच घडते जेव्हा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एक अतुट बंधन असते.  त्यासाठी शिक्षकांना सन्मानाने वागणूक दिली पाहीजे. कारण तो/ती समाज देश घडवत असतो. फक्त ते दृश्य स्वरुपात आपल्याला दिसत नाही.

जेव्हा शिक्षकांना सन्मानाने वागणूक मिळेल शिक्षक आपोआप जबाबदारीने अध्यापनाचे कार्य करतील. शिक्षकांना आर्थिक स्वरुपाच्या सोयी-सुविधा कमी देत असाल तरी चालेल पण त्यांना चार-चौघात आदर मिळायला हवा.

आजकाल शिक्षक असेल तर लग्नाला लवकर मुलगी सुध्दा मिळत नाही. मला वाटते जो पगार कॉलेजमध्ये प्राध्यापकाला मिळतो तो पगार प्राथमिक/पुर्व प्राथमिक शिक्षकांना मिळाला पाहिजे आणि याउलट पुर्व-प्राथमिक शिक्षकांचा पगार प्राध्यापकांना द्यायला हवा. कारण पाया रचणारा महत्वाचा असतो, कळस बांधणारा नाही.

संपूर्ण व्यक्तिमत्वाचा पाया पहिल्या बार्‍या वर्षाच्या आत रचला जातो. लहानपणी  मिळालेल्या अनुभवांवरच मुलांचे भावनिक आणि मानसिक स्वास्थ भविष्यात ठरत असेत. मग पुर्व-प्राथमिक शाळेत शिकवणारे शिक्षक हे उत्तम व्यक्तिमत्वाचे, विधायक मानसिकतेचे हवे. त्यासाठी या शिक्षकांचे योग्य कौतुक होणे, सन्मान होणे आवश्यक आहे. जणे करुन त्यांना अध्यापनाच्या कार्यात प्रोत्साहन मिळेल. त्यांना स्वत:मध्ये सातत्याने बदल करावसा वाटेल.

त्यासाठी समाजानं आपल्या बोलण्या-वागण्यात शिक्षकांना सन्मान द्यावा लागेल.�सोशल मिडीयावरील टिचर्स जोक बंद व्हायला हवे. एका दारुच्या कंपनीनेच व्हिस्कीचे नांव ‘टिचर्स’ ठेवल. त्यावर बंदी यायला हवी. पालक सभेमध्ये पालकांनी शिक्षकांशी बोलतांना नम्रपणा ठेवला पाहीजे. राजकरण्यांनी शिक्षकांचा वापर स्वत:च्या सोयीसाठी करणे थांबले पाहिजे. सरकारी अधिकार्‍यांनी शिक्षकांना अरे-तुरे ची भाषा बंद केली पाहिजे.

आज असे चित्र आहे की, सर्व ठिकाणी नोकरीचा अर्ज दिला आणि कुठेच नोकरी नाही मिळाली की, मग शेवटचा अर्ज शिक्षक होण्यासाठी असतो. मग शिक्षकाची नोकरी लागली की, पार्ट टाईम बी.एड. चा अभ्यासक्रम पुर्ण केला जातो. आपल्या देशात सर्वात शेवटचा करीअर मार्ग ‘शिक्षकी पेशा’ कडे पाहिले जाते आणि जपानमध्ये पहिले करीअरची पसंती टिचर्स होण्यासाठी असते.
जपानमध्ये शिक्षक होण्यासाठीची पात्रता परीक्षा ही भारतातल्या आय.ए.एस. परीक्षेच्या समानतेची असते. जपान नागरीक ती परीक्षा पास होऊ शकला नाही तर त्याला खुप वाईट वाटते किंबहुना तो रडतो कि मी शिक्षक होऊ शकलो नाही, शिक्षक होण्याची पात्रता माझ्यात नाही. ही भावना नागरीकांमध्ये येण्याचे कारण जपानमध्ये सर्वात जास्त सन्मान आणि आदर शिक्षकांना आहे.
अशा करु भारतात राजकारणी, सरकारी अधिकारी, संस्थाचालक, पालक आणि सर्व समाजच शिक्षकांना आदराने वागवेल. एक पुरस्कार आणि शिक्षक दिन सोहळे फक्त यांनी सन्मान मिळणार नाही तर आपल्या वागण्याबोलण्यातून प्रत्येक शिक्षकांसाठी यायला पाहिजे.

जेव्हा हा सन्मान येईल तेव्हा सारा देश शिक्षकांकडे आशेने पाहिले,  त्यांच्या कार्याला रोज सलाम करेल, मुलांच्या स्वप्नांना भरारी देणारा कलाम शिक्षकांत पाहिल.

-------------------------------------------------------------------
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

Post a Comment

[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.