ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) वास्तव जगातील आभासी विश्व......

ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) वास्तव जगातील आभासी विश्व......
काही वर्षांपूर्वी तरुण मुलं घरात कमी आणि मैदानात, अंगणात जास्त वेळ खेळत. तो काळ हळूहळू ओसरला आणि टीव्हीचं वेड वाढलं. मुलं त्यांचा बराचसा वेळ घरात टीव्हीसमोर घालवू लागली. त्यानंतर व्हिडिओ गेमचा जमाना आला व्हिडिओ गेम्सचं वेड साधारण दहा, पंधरा वर्षांत ओसरलं. त्यानंतर काही काळ कोम्पेक्ट हातात घेऊन खेळता येणारे आणि टीव्ही न लागणारे व्हिडिओ गेम्सही येऊन गेले. याच दरम्यान मोबाइल फोन्सचाही जमाना आला मोबाइल हॅण्डसेटसच्या टेक्नॉलॉजीमध्ये विलक्षण वेगाने बदल होत गेले. आज या डिव्हाइसला 'स्मार्ट फोन' असं म्हणतात गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये मोबाईल हँडसेट्स खरोखरच स्मार्ट झाले आहेत. त्यांचे रोज नवीन उपयोग लक्षात येतात आणि या क्षेत्रातील तंत्रज्ञ नवनवीन अॅप्लीकेशन्स विकसित करून हँडसेट्सची उपयुक्तता वाढवत असतात. मोबाईल फोनचा वापर केवळ इतरांशी बोलण्यासाठीच किंवा एसएमएस पाठवण्यासाठी होतो, ही बाब आता जुनी झाली असून रक्तदाब मोजण्यापासून टीव्हीच्या रिमोट कंट्रोलपर्यंत अनेक प्रकारे हँडसेटचा वापर करता येतो.  मोबईल स्मार्ट झालेत आणि अनेक नवे नवे तंत्रज्ञान वापरून नवीन शोध लागत आहेत त्यातीलच नवी संकल्पना ‘ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR)’......
ऑगमेंटेड रिअॅलिटी म्हणजे काय?... तर तंत्रज्ञानाला हाताशी धरून एक आभासी विश्व निर्माण करायचं आणि त्यामध्ये युजरला गुंतवून ठेवायचं आणि एक वेगळी अनुभूती द्यायची हाच यामागचा उद्देश. बऱ्याच अंशी तो यशस्वीही होताना दिसतोयकाल्पनिक जग सत्यात उतरवणाऱ्या या तंत्राला टेक्निकल भाषेत 'ऑगमेंटेड रिअॅलिटी' असंही म्हणतात. सोप्या शब्दात ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणजे काय सांगायचं झालं तर वास्तव जगावर (रिअ‍ॅलिटी) आभासी विश्वचं.....  कम्प्युटर जनरेटेड ग्राफिक्स, हे या टेक्नोलोजीचं केंद्रस्थान आहे. मोबाइलचा आकार, स्क्रिन, रेझोल्युशन, मेमरी, साऊण्ड, कीपॅड, प्रोसेसर, कॅमेरा, यानुसार फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या ग्राफिक्समध्ये बदल केले जातात. या ग्राफिक्सना फोनवर चालण्यासाठी कम्प्युटरसारखीच एक ऑपरेटिंग सिस्टिम लागते. १९९० मध्ये थॉमस कोडेल यांनी प्रथम संकल्पना मांडली  पण त्याचा वापर १९९८ मध्ये फुटबॉल मॅच टीव्हीवर दाखवताना करण्यात आला. सध्या ऑगमेंटेड रिअॅलिटीमध्ये ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) चा वापर करून वापरकर्त्याचे स्थान आणि ३ डी  ग्राफिक चा वापर करून एक आभासी जग निर्माण केले जाते...
 नेदरलॅण्डमध्ये वापरलं जाणारं लोकप्रिय लायेर किंवा लेयर हे अ‍ॅप याच तंत्रज्ञानावर आधारलेलं आहे. एखाद्या बिल्डिंगच्या दिशेने स्मार्टफोन धरून कॅमेरा सुरू केला की त्या बिल्डिंगमध्ये असणारी ऑफिसेसची नाव स्क्रीनवर येतात. एवढंच नाही तर तिथे नोकरीसाठी जागा आहे का हेसुद्धा स्क्रीनवर दाखवलं जातं. अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएसवर अशी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. बरीच हवा केलेल्या पॉकेमॉन गो  गेम, मोदी  के नोट  मूळ संकल्पना ती हीच.

भारतात तर प्रचार सुद्धा ग्लोबल होताना दिसतोय....... तुम्ही घरात आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर बसला आहात आणि मुख्यमंत्री चक्क तुमच्या घरात येऊन भाषण देत आहेत .... हे स्वप्नवत वाटत असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून भाजपने निवडणूक प्रचारात आता अनोखी  शक्कल लढवून हे शक्य करून दाखवले आहे . जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इनव्हाइट सीएम’ नामक नवीन अॅपच्या मध्येही  ऑगमेंटेड रिअॅलिटीचाच वापर केलेला आहे.... तसेच मराठी सिनेमानेही कात टाकलेली आहे..... ‘१९०९- स्वातंत्र्ययुद्धातील एक ज्वलंत अध्याय’ या मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी’ या अद्ययावत अ‍ॅप्लिकेशनची मदत घेण्यात आली आहे. या चित्रपटाची वर्तमानपत्रातील जाहिरात उघडून १९०९ या अंकावर कॅमेरा धरायचा आणि अ‍ॅप्लिकेशन ऑन करायचे. त्यानंतर लगेचच तुमच्या मोबाइलच्या स्क्रीनवर या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा अनंत कान्हेरे व अन्य प्रमुख व्यक्तिरेखा समोर येतील  आणि चित्रपटातील संवाद म्हणतील. याद्वारे या चित्रपटाची प्रसिद्धी करण्याचे ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी हे तंत्र वापरण्यात आले आहे. तंत्रज्ञानाला हाताशी धरून एक आभासी विश्व निर्माण करायचं आणि त्यामध्ये युजरला गुंतवून ठेवायचं आणि एक वेगळी अनुभूती द्यायची हाच यामागचा उद्देश. बऱ्याच अंशी तो यशस्वीही होताना दिसतोय...... या तंत्रज्ञानात अजूनही अनेक बदल होतील. नवे शोध लागतील. रिअॅलिटीच्या इतकं जवळ जाऊ पाहणारे हे ग्राफिक्स अॅप्स लहानथोरांना वेड लावल्याशिवाय राहणार नाहीत

Post a Comment

[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.