रॅनसमवेअर


'वॉन्नाक्राय रॅनसमवेअर' या नवीन व्हायरसमुळे सध्या जगभरात भितीचे वातावरण आहे. या व्हायरसमध्ये भारतासहित जगातली सर्व संगणक प्रणाली हॅक करण्याची ताकद आहे. रॅन्सम’ हा इंग्रजी शब्द आहे याचा अर्थ आहे खंडणी म्हणजेच या व्हायरसचा वापर करून संगणक हॅक करायचा आणि खंडणी वसूल करायाची.... पण हा व्हायरस आला कोठून कसा तयार झाला याची माहिती घेतली असता असे दिसून आले   अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने मायक्रोसॉफ्ट विडोंज प्रणाली मध्ये सिक्युरिटी मध्ये छेद होऊ शकतो असे त्यांना दिसून आले त्याद्वारे रॅनसमवेअर हा मालवेअर प्रोग्रॅम स्वता:साठी  माहिती मिळवण्यासाठी तयार केला होता, परंतु तो चोरीला गेला, आणि जगाला एका मोठ्या धोक्याला समोर जावं लागत आहेत....
रॅनसमवेअर दोन प्रकारचे असतात एक इनस्क्रिप्शन रॅनसमवेअर यामध्ये डेटा इनस्क्रिप्ट केला जातो यामध्ये लॉकि(Locky), क्रीप्टोवॉल(CryptoWall), क्रीप्टोलॉकर (CryptoLocker) आणि दुसरा प्रकार म्हणजे  लॉकर रॅसमवेअर यामध्ये संगणक लॉक केला जातो.... यामध्ये पोलीस-थीमड रॅसमवेअर (Police-Themed ransomware) आणि विनलॉकर (WinLocker) असे कुप्रसिद्ध मालवेअर आहेत......
'वॉन्नाक्राय' नावाचा रॅनसमवेअर व्हायरस हा पूर्वीच्या इतर व्हायरसपेक्षा वेगळा आहे. व्हायरस हा एक प्रकारचा प्रोग्राम असतो. आधीचे व्हायरस क्लिक केल्यास सर्व प्रकारचा डेटा नष्ट करायचे किंवा डेटा चोरायचे. मात्र रॅनसमवेअर व्हायरस डेटा नष्ट करत नाही किंवा डेटाची चोरी करत नाही. तर तो डेटा इनस्क्रिप्ट करतो. डेटा इनस्क्रिप्ट करणे म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर कोणताही शब्द उलटा करणे. अंकाच्या बाबतीतही असेच करायचे. आपण वाचण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपण वाचू शकत नाही, अशी परिस्थिती तयार होते....  'वॉन्नाक्राय' नावाच्या रॅनसमवेअर व्हायरसला संगणकामध्ये एकदा प्रवेश मिळाला, तर तो सर्व डेटा इनस्क्रिप्ट करुन टाकतो....आणि त्याद्वारे डेटा डिस्क्रिप्ट करण्यासाठी खंडणी मागायची... हि खंडणी बीटकॉईन या डिजिटल करन्सी मध्ये केली जाते ज्यावर कोणत्याही बँकेचे नियंत्रण नाही असे ३०० ते १२०० बीटकॉईनची मागणी हे हॅकर्स करत आहेत.  रॅनसमवेअर व्हायरसच्या माध्यमातून पैसे मागण्यासाठी त्यांनी अमेरिकेपेक्षा इतर देशांना लक्ष्य केले असेल. अमेरिकेमध्ये याबाबत संशोधन झालेले आहे. काहींनी रॅनसमवेअर व्हायरसमधील लिंकचा शोध घेऊन तो डिस्क्रिप्ट करण्याचा उपाय शोधला आहे. त्यामुळे अमेरिकेत 'वॉन्नाक्राय' रॅनसमवेअर व्हायरसचे धोके टाळण्यात आले आहेत. मात्र ही माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही...
'वॉन्नाक्राय' रॅनसमवेअर व्हायरसचे धोके टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?  तर...गरज नसेल तेव्हा संगणक सुरु करु नका. संगणक सुरू करायचा असला तरी ओळखीच्या व्यक्तीकडून आलेलाच मेल उघडा. तो बघतानाही काळजी घ्या. कारण कित्येकवेळा व्हायरस ओळखीच्या व्यक्तीकडून मेल आलेला आहे, असा भास निर्माण करतात. मेल उघडल्यानंतर व्हायरस तुमच्या संगणकाच्या डेटावर हल्ला करतो. त्यामुळे शक्य नसेल तर ओळखीच्या व्यक्तीकडून मेल आला आहे का, याची खबरदारी घ्यावी. व्यक्तीकडून आलेल्या मेलचा विषय माहीत असेल तरच मेल उघडावा. अनोळखी व्यक्तीकडून आलेले मेल्स उघडू नका. अँटी व्हायरस अद्यावत वापरावे.
सध्याचा 'वॉन्नाक्राय' रॅनसमवेअर मायक्रोसॉफ्ट विडोंज प्रणालीवर अटॅक करत असला तरी संगणकांप्रमाणे स्मार्टफोन ला ही हॅकिंग चा धोका वाढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा तुमच्या स्मार्टफोन वर काही जाहिराती दाखवल्या जातात त्यातील काही जाहिराती ह्या हॅकरने तुम्हाला भुलवण्यासाठी सुद्धा टाकल्या असू शकतात .त्यामुळे अशा जाहिरातीला क्लिक करू नये तसेच एतुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टाल करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे पाहून घ्या . शक्यतो गुगल प्ले वरून एप इन्स्टाल करा . कुठलीही ए पी के फ़ाइल घेऊन तुमच्या स्मार्टफोन वर इंस्टाल करू नका

Post a Comment

[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.