आले.......! अमेझॉनचे ‘अॅनिटाईम’ मॅसेंजर

आले.......! अमेझॉनचे ‘अॅनिटाईम’ मॅसेंजर
सध्याचे युग मॅसेंजरचे आहे असे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही व्हाटसअॅप, फेसबुक मॅसेंजर, व्हायबर, हाईक, टेलिग्राम, आय मॅसेज, ॅलो आदी मॅसेंजर्सला जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली आहे. या पार्श्वभूमिवर आता अमेझॉन कंपनीदेखील मॅसेंजर लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे.-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन लवकरच इंस्टेंट मॅसेजिंग अॅप आणणार आहे. कंपनीने आपलं नवं इंस्टेंट मॅसेजिंग अॅप अॅनिटाईम घेऊन येणार आहे. ज्यामुळे व्हॉट्सअॅप आणि फेसबूक मॅसेंजर सारखे अॅप्सला पर्याय देणार आहे.अॅमेझॉनचा अॅनिटाईम अॅप आयओएस, अँड्राईड आणि डेस्कटॉप तिघांना सपोर्ट करणार आहे. सध्या हे अॅप टेस्टिंगमध्ये आहे आणि लवकरच लॉन्च केलं जाणार आहे.

अमेझॉनच्या मॅसेंजरमध्ये सर्व अत्यावश्यक फिचर्स असतील. अर्थात यात वैयक्तीक चॅटींग आणि सामुदायीक ग्रुप्समध्ये संदेश/प्रतिमा/व्हिडीओ आदींची देवाण-घेवाण करता येईल. तसेच यासोबत इमोजी, जीआयएफ आणि स्टीकर्स शेअरिंगचे पर्यायदेखील राहतील. हे मॅसेंजर अँड्रॉइड, आयओएस आणि वेब या तिन्ही प्लॅटफॉर्मवर काम करेल. व्हिडीओ आणि प्रतिमांना सुशोभित करण्यासाठी यात अत्यंत आकर्षक असे फिल्टर्स देण्यात येतील. तर यावरून उच्च दर्जाचे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलही करण्यात येतील. याशिवाय यात लोकेशन शेअरिंग, गेमींग, बिझनेस चॅट, कस्टमाईज्ड चॅटींग आदी विशेष फिचर्सदेखील असतील असे यात नमूद करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये अमेझॉनचे एनीटाईम हे मॅसेंजर लाँच करण्यात येईल अशी शक्यता आहे. एंड-टू-एंड एनक्रिप्शनचे कवच लाभलेल्या या मॅसेंजरमध्ये मोबाईल क्रमांकाने नव्हे तर अमेझॉनच्या अकाऊंटने लॉगीन करण्याची सुुविधा असण्याची शक्यता आहे. या अॅपचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही व्यक्तीसोबत बोलत असतांना तुमचा नंबर त्यावर दिसणार नाही. व्हॉट्सअॅप किंवा इतर अॅपमध्ये मात्र तुमचा नंबर दुसऱ्याला कळतो.

Post a Comment

[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.