बॅकअप

बॅकअप

मे महिन्यात संपूर्ण जगाला खंडणीखोर मालवेअरने हैराण केले होते. अनेकांनी खंडणी भरून आपली माहिती सोडवून घेतली तर अनेकांनी याचा प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. स्मार्टफोनच्या युगात तुमच्या फोनमधील माहितीचा बॅकअप दिवसातून एकदा घेतला गेलाच पाहिजे. कारण फोन कधी आणि कोणत्या वेळी करप्ट होऊ  शकतो याची शाश्वती आपण देऊ  शकत नाही. तसेच हॅकिंग किंवा चोरीची भीतीही आहेच. अशा वेळी जर बॅकअप नसेल तर आपण मोबाइलमधील सर्व माहिती गमावू. आपल्याला चोरीला गेलेला फोन परत मिळाला तरी त्यातील माहिती काढून घेतली तर ती परत मिळू शकणार नाही. जर तुम्ही बॅकअप घेतला असेल आणि फोन तुम्ही रिस्टोअर केला तर तुम्ही बॅकअप घेतलेल्या वेळेपर्यंतची सर्व माहिती तुम्हाला पुन्हा मिळू शकते. काही महत्त्वाची माहिती तुम्ही क्लाऊड, तुमचा संगणक किंवा फ्लॅश ड्राइव्हमध्येही साठवून ठेवू शकता.त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर वरून फक्त एक अॅप्लीकेशन डाऊनलोड करून घ्यायचे आहे त्याचे नाव आहे ‘सुपरबॅकअप’  यामध्ये आपल्याला मोबईल नंबर, एसएमएस, दिनदर्शिका , अॅप्स, कॉल लॉग्स, बुकमार्क  यासारख्या सर्व गोष्टीचा तुम्ही बॅकअप करून ठेऊ शकणार आहे....त्यासाठी या मधून आपण आपल्या सदर फाइल चे बॅकअप one touch मध्ये घेऊ शकत फक्त फाइल समोरील बॉक्स मध्ये क्लिक करायचे व बॅकअप ला टच करायचे.आपल्या फोन स्टोरेज मध्ये अॅप्स व तसेच इतर बाबींचे बॅकअप तयार होते व त्या नांवाचे वेगळे फोल्डर आपणास आपल्या स्टोरेज मध्ये दिसते,हि फाइलआपण कॉपी करून आपल्या संगणक किंवा फ्लॅश ड्राइव्हमध्येही ला ठेवू शकतो यामधून आपण आपले बॅकअप पाहू शकतो तसेच क्लाऊड सेंड करू शकतो यामधून बॅकअप डिलिट करता येते अशा प्रकारे हे ऑप्शन सर्व पर्यायाला उपलब्ध आहेत तसेच अॅप लिंक सुद्धा स्टोअरआपण येथूनच मिळवू शकतो या एप्प ला काही सेंटिग पर्याय दिलेला आहे.आपण आपल्यासोयीनुसार सेटिंग करू शकतो

Post a Comment

[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.