मातृभाषेतून कोर्सेस

मातृभाषेतून कोर्सेस
कोणत्याही क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेतलेले कायम फायद्याचेच ठरत असते असे म्हटले जाते. अनेक लोकांना पूर्वी पैशाच्या कमतरतेअभावी किंवा इतर कारणांनी हवे त्या श्रेत्रात शिक्षण घेता येत नव्हते. पण आज इंटरनेटमुळे सर्व काही शक्य झाले आहे. तुम्हाला हव्या त्या क्षेत्रातील अनेक कोर्सेस तुम्हाला अगदी मोफतही शिकता येतात. इंटरनेटवर अशा प्रकारचे काही कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाटी तुम्हाला प्ले स्टोअर वरून नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स अप्लिकेशन डाउनलोड करावे लागणार आहे...
या अॅपमध्ये तुमचं करिअर पुढे न्यायला मदत करतील असे अनेक कोर्सेस आहेत. कधीही , केव्हाही आणि कुठेही, आपल्या वेगाने आणि आपल्या सवडीने शिकता येतील असे हे कोर्सेस आहेत. आपल्याला वेळ मिळेल तसे हे कोर्सेस तुम्ही शिकू शकता. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हे कोर्सेस तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही शिका ! ​अगदी आपल्या वेगाने शिका! एखादा भाग न कळल्यास पुन्हा पुन्हा कितीही वेळा व्हिडीओ पाहता येतात. हे व्हिडीओ तुमच्या वेळेनुसार हे सदैव २४ तास दिमतीस असतील ! मराठीतून शिकल्याने विषय कळतो आणि प्रॅक्टीकली वापरूनही पाहता येतो.

आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याला पर्याय नाही. आजच्या संगणकाच्या युगात बहुतेक जण सफाईने संगणक हाताळतात. ज्यांना संगणक व्यवस्थित चालवता येत नाही त्यांना प्रचंड अडचणींना तोंड दयावे लागते. अशी अडचणीची वेळ आपणावर येऊ नये म्हणून नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स सारखी ऑनलाईन कोर्सेसची अप्लिकेशन डाउनलोड करून आपल्या ज्ञानात भर टाकता येईल....

Post a Comment

[blogger]

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.